breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

England vs India 4th test: इंग्लंडला चौथा धक्का; ओव्हरटनची उमेश यादवाकडून शिकार

भारतीय संघाने चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी दमदार सुरुवात केली आहे. उमेश यादवने ओव्हरटनला बाद करत भारताला चौथे यश मिळवून दिले. इंग्लंडने २० षटकात ४ बाद ५४ धावा केल्या आहेत. डेव्हीड मलन आणि पोपे मैदानावर आहेत.

भारतीय फलंदाजांचे ये रे माझ्या मागल्या असे रडगाणे चौथ्या कसोटीतही दिसून आले. भारताचा पहिला डाव अवघ्या १९१ धावांमध्ये गुंडाळला. शार्दुल ठाकूरने केलेल्या आक्रमक फलंदाजीमुळे भारताला किमान सन्मानजनक धावसंख्या उभारता आली.

भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या जोरदार आक्रमण करताना इंग्लंडला काल शेवटच्या दिवशी तीन धक्के देत दमदार सुरुवात करून दिली. उमेश यादवने अप्रतिम चेंडूवर ज्यो रुटचा काटा काढत भारताला मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आज दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाज किती चमकदार कामगिरी करतात, यावर बरेच काही अवलंबून असेल. इंग्लंडने पहिल्या दिवसअखेर ३ बाद ५३ धावा केल्या असून ते १३८ धावांनी पिछाडीवर आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button