breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयमहाराष्ट्रमुंबई

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा रुग्णालयात दाखल; तुरुंगात बिघडली तब्येत

मुंबई । महान्यूज ।

एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची प्रकृती खालावली आहे. प्रदीप शर्मा यांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तुरंगात त्यांची प्रकृती बिघडली आहे. मनसुख हिरेन खून प्रकरणात प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप शर्मा यांच्या पोटात गेल्या काही दिवसांपूर्वी पोटात दुखत होते. पोटात सतत दुखत असल्यामुळे शर्मा यांना सुरक्षेच्या दृष्टीने ससून रुग्णालात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची सोनोग्राफी करण्यात येणार आहे. तसेच, पुढील उपचारासाठी शर्मा हे सध्या ससूनमध्ये आहेत.

दरम्यान, मुकेश अंबानी यांच्या निवासस्थान म्हणजेच अँन्टिलियाबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणी आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली होती. सध्या प्रदीप शर्मा न्यायालयीन कोठडीत आहेत.
मुंबई पोलिस दलातील कार्यरत असताना त्यांच्यावर आत्तापर्यंत 113 एन्काऊटंरची नोंद आहे. प्रदीप शर्मा यांनी शिवसेनेच्या तिकीटावर नालासोपारा मधून 2019 ची विधानसभा निवडणूक लढवली होती मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता

चक्कर आल्याने अनिल देशमुख तुरुंगात पडले
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख चक्कर आल्याने तुरुंगात पडले. त्यामुळे मुंबईतील जे. जे. रुग्णालयात देशमुख यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तुरुंगात छातीत दुखण्याची अनिल देशमुखांची ही दुसरी वेळ आहे. याआधीही छातीत दुखत असल्याने त्यांना परळच्या केईएम रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button