ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षपदी ज्योती सचिन निंबाळकर यांची निवड महिला प्र

देशाध्यक्ष आमदार विद्याताई चव्हाण यांच्या हस्ते मुंबई प्रदेश कार्यालय येथे नियुक्ती

पिंपरी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आमदार विद्याताई चव्हाण यांच्या हस्ते आज दिनांक (२२) मुंबई प्रदेश कार्यालय येथे पिंपरी चिंचवड शहराच्या महिला अध्यक्षपदी सौ ज्योती सचिन निंबाळकर यांची निवड करण्यात आली.

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण म्हणाल्या “शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारधारे नुसार देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने दडपशाही करणाऱ्या भ्रष्टाचारी भाजप सरकारच्या विरोधात एक मोठं जनआंदोलन उभे झाल्याचे चित्र महाराष्ट्रात दिसत आहे. जनतेच्या मनात काय आहे हे येवला आणि बीड येथील झालेल्या सभेत जनतेने दाखवून दिले आहे. लोकशाही वाचवण्याच्या या लढाईमध्ये राज्यातील महिला, युवक-युवती हे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले.”

यावेळी बोलताना नवनिर्वाचित महिला अध्यक्ष सौ ज्योती निंबाळकर म्हणाल्या “आमची थेट लढाई ही भ्रष्टाचार करणाऱ्या भाजपसोबत असून येणाऱ्या काळात आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, संसदरत्न सुप्रियाताई सुळे,यांच्या विचारधारेनुसार महिला संघटना मजबूत करणार असून,विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख आणि कार्यकारी समिती मधील सदस्य व शहरातील महिला यांच्या साथीने पिंपरी चिंचवड शहरामध्ये भ्रष्टाचारी भाजपाला सत्तेतून हद्दपार करत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा महापालिकेवर फडकवणार या दृष्टीने राष्ट्रवादी महिलाआघाडी काम करणार असून असल्याचे त्यांनी सांगितले.प्रदेशअध्यक्ष विद्याताई चव्हाण यांनी दिलेल्या संधीचं नक्कीच सोनं करून दाखवील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, कामगार नेते काशिनाथ नखाते,सचिन निंबाळकर, विशाल शिरसागर,विशाल शिंदे, शाहिद शेख,अशोक हरपळे,सुवर्णा वाळके,कविता देवकर,दिपाली पारखे,मनीषा निंबाळकर उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button