breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

‘शेतकरी पाणी मगतो त्यावेळेस हे काय म्हणतात?’; एकनाथ शिंदेंचा अजित पवारांना टोला

सत्ता गेल्यामुळे लाईनवर येतील पण ते ऑनलाईन आले

पुणे : पुण्यात कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कसबा मतदारसंघात हजेरी लावली होती. भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रारासाठी मुख्यमंत्री शिंदे उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

जेव्हा शेतकरी पाणी मगतो त्यावेळेस हे काय म्हणतात? मी यावर फार काही बोलत नाही. परंतु अशा लोकांकडून काय अपेक्षा करणार? अजित पवार म्हणाले मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभा घ्यायची असते, रोड शो करायची काय गरज असते? हा एकनाथ शिंदे माणसातला कार्यकर्ता आहे, लोकांना भेटणारा माणूस आहे, तोंड लवपवून पळणारा नाही. आम्ही लोकांना सामोरं जाणार आहोत. आम्ही असं चुकीचं काही केलं बोलत नाही, की कृष्णेच्या काठावर जाऊन प्रायश्चित घेण्याची वेळ आमच्यावर कधी आली नाही, येणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

अजित पवार शिवसेनेचे नेते शोभत आहेत. ते आम्हाला सहा महिन्याचा हिशोब विचारता, तुम्ही सत्ता उपभोगली साठ वर्षे पुण्यात काय केले ते सांगा. आता आम्ही सरकारमध्ये आहोत. चिंता करू नका, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

सोबतच, उद्धव ठाकरे यांच्यावर बोलताना म्हणाले की, आमचे जुने नेत्यांनी ऑनलाईन सभा घेतली आम्हाला वाटलं सत्ता गेल्यामुळे लाईनवर येतील पण ते ऑनलाईन आले, त्यांना कोणीतरी सांगितले असेल कसब्यात येवून काही उपयोग नाही, कारण येथे आपला आमदार निवडून येत नाही, अशी टीका एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button