ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहरातून आठ दुचाकी दोन सायकल चोरीला

पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. दररोज वाहन चोरीच्या घटना उघडकीस येत आहेत. सोमवारी (दि. 19) पिंपरी-चिंचवड शहरात आठ दुचाकी वाहने चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या. तसेच चिंचवड परिसरातून दोन सायकल आणि चाकण मधून इको कारचा सायलेन्सर चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे.थरमॅक्स चौक, चिंचवड येथून 16 मार्च रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजताच्या कालावधी अज्ञात चोरट्यांनी एक दुचाकी (एम एच 12 / एसी 1515) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत अमित एकनाथ चव्हाण (वय 32, रा. अजंठानगर, चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.भोसरी मधील जनाई हाइट्स शेजारील सार्वजनिक रोडवर पार्क केलेली 15 हजारांची दुचाकी (एम एच 14 / बी झेड 6378) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत अमोल मोहन हांडे (वय 32, रा. दिघी रोड, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

चाकण परिसरातून दोन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. त्यातील पहिल्या प्रकरणात योगेश राधाकिसन पगारे (वय 40, रा. खालुम्ब्रे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांची 40 हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 14 / एच वाय 6286) त्यांच्या घरासमोरून चोरून नेली.दुसऱ्या प्रकरणात विशाल दत्तात्रय दवणे (वय 19, रा. दवणेवस्ती, आंबेठाण) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांची दहा हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 14 / एफ आर 5402) अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दारातून 11 जुलै रोजी सकाळी सात ते नऊ वाजताच्या कालावधीत चोरून नेली.कडाचीवाडी येथे मोकळ्या जागेत पार्क केलेल्या इको कारचा (एम एच 14 / जे ए 5957) 35 हजारांचा सायलेंसर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 17) रात्री नऊ ते सोमवारी (दि. 19) सकाळी साडेसात वाजताच्या कालावधीत घडली. याबाबत ईश्वर बाळासाहेब कोतवाल (वय 32, रा. कडाचीवाडी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.शैलेश चिदानंद दोडमनी (वय 35, रा. दळवीनगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची 30 हजारांची दुचाकी (एम एच 14 / ई एल 3848) अज्ञात चोरट्यांनी 9 जुलै रोजी दुपारी तीन ते रात्री साडेअकरा वाजताच्या कालावधीत यशवंतनगर पिंपरी मधील टाटा मोटर्सच्या पार्किंगमधून चोरून नेली.

सैफन मोजीफुल शेख (वय 18, रा. किवळे, रावेत) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शेख यांची 10 हजारांची दुचाकी (एम एच 14 / बी बी 5021) अज्ञात चोरट्यांनी किवळे येथून चोरून नेली. हा प्रकार 17 जुलै रोजी सकाळी उघडकीस आला.तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात वाहनचोरीचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील पहिला प्रकार गहुंजे स्टेडियम जवळ घडला. याप्रकरणी गणेश मधुकर रणधीर (वय 29, रा. गहुंजे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 14 / जी पी 9534) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार सोमवारी (दि. 19) सकाळी उघडकीस आला.वाहन चोरीची दुसरी घटना परंदवडी येथे सोमवारी (दि. 19) सकाळी उघडकीस आली. विनोद गंगाराम भोते (वय 32, रा. परंदवडी ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांची दहा हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 14 / ए टी 4960) तीन चोरट्यांनी त्यांच्या घरासमोरून चोरून नेली.प्रेमलोक पार्क, चिंचवड मधून एका घराच्या पार्किंग मधून दोन सायकल चोरीला गेल्याची घटना 15 जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. याबाबत बाजीराव सदाशिव नाईक (वय 42) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी नाईक यांची चार हजार रुपये किमतीची आणि मुकुंद अरविंद चव्हाण यांची दोन हजार रुपये किमतीची सायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button