पाटी-पुस्तक

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रम

शिक्षण विश्व: रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात अभिवादन

पिंपरी-चिंचवड: पिंपरीतील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीच्या सदस्य मा. प्रा. डॉ. जयश्री मगदूम या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

हेही वाचा : शिवालिक, नंदादेवीनंतर आता ‘जग लाडकी’ जहाजही भारतात पोहचलं

महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो .डॉक्टर पांडुरंग भोसले यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जयश्री मगदूम यांनी लक्ष्मीबाई पाटील यांच्या कार्याचा गौरव केला. लक्ष्मीबाई पाटील यांचा जीवनपट उलगडून दाखवताना मगदूम यांनी लक्ष्मीबाई पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांना दिलेल्या खंबीर साथीची माहिती दिली. यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रो.पांडुरंग भोसले यांनी लक्ष्मीबाई पाटील यांच्या त्यागाची माहिती दिली.

लक्ष्मीबाई पाटील यांनी संपूर्ण आयुष्य आयुष्य विद्यार्थ्यांच्या हितासाठी घालवण्याचे स्पष्ट केले. या कार्यक्रमाला विज्ञान शाखेच्या उपप्राचार्य प्रो. डॉ. संगीता अहिवळे, कला शाखेच्या उपप्राचार्य प्रो.डॉ. कामयानी सुर्वे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य प्रो.डॉ. सुहास निंबाळकर, बी. व्होक मास कम्युनिकेशनचे नोडल अधिकारी डॉ. दत्तात्रय हिंगणे, प्रा. स्वप्ना हजारे, डॉ. शुभदा लोंढे, डॉ.निळकंठ डहाळे उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button