breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रियव्यापार

माथाडी कामगार यांच्या प्रश्नाबाबत भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षा रक्षक कामगार युनियन सरसावली

  • मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , पोलीस आयुक्तांना निवेदन …

पुणे । महाईन्यूज ।

पुणे जिल्ह्यातील मे. डन्झो डिजिटल प्रा. लि. या आस्थापनेत काम करणारे नोंदीत माथाडी कामगार हे गेल्या ७-८ महिन्यापासून विना वेतन काम करीत आहेत . दिवाळी सण असून सुद्धा या आस्थापना यांनी कामगारांना वेतन दिले नसल्याने कामगारांची दिवाळी साजरी होऊ शकली नाही.
मे. डन्झो डिजिटल प्रा. लि. काम करणारे नोंदीत व अनोंदित माथाडी कामगार हे गेल्या अनेक महिन्यांपासून विविध प्रकारच्या समस्या प्रश्नांना समोरे जात आहे. संघटनेच्या वतीने त्याच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी पुणे माठडी मंडळात रीतसर पत्रव्यवहार करून तसेच संबधीत प्रश्नाबाबत दि.०५.०७.२०२२ रोजी बैठक आयोजित करून त्या बैठकीत हा प्रश्न मांडण्यात आला . त्यात या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना नोंदीत करण्याचे आदेश देण्यात येऊन कामगार नोदीत झाले . त्यानुसार १ ऑगस्ट पासून हें सर्व कामगार कंपनीच्या आवरात सर्व नियमानुसार इमाने इतबारे काम करत आहे. दि.१ ऑगस्ट पासून आजतागात ५० दिवस होऊन सुध्दा या कष्टकरी माथाडी कामगार यांना त्यांच्या श्रमाचा मोबदला मिळाला नाही. कामगारांना वेतन देण्याच्या माथाडी मंडळाच्या आदेशाला ही ह्या डन्झो डिजिटल प्रा. लि. या कंपनीने केराची टोपली दाखवली आहे. एकी कडे ऑनलाईन शॉपिंग च्या माध्यमातून ग्लोसरी वस्तूचा पुरवठा करणारी ही कंपनी ग्राहकांनी ऑनलाईन वस्तू खरेदी करावी याकरिता करोडो रुपये जाहीरातीवर खर्च करणारी ही डन्झो डिजिटल प्रा. लि. आस्थापना कामगार कायद्याची पायमल्ली करून त्यांच्या कामगाराना देशोधडीला लावण्याचे काम करीत आहे.

डन्झो डिजिटल प्रा. लि. या कंपनीच्या या धोरणाविरोधात भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षारक्षक जनरल कामगार युनियन यांच्या वतीने कामगारांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत बेमुदत आंदोलन करण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button