breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

डॉ. पूनम निघुते आत्महत्या प्रकरणी पतीविरुद्ध हुंडाबळीचा गुन्हा

संगमनेर |

संगमनेरातील महिला डॉ. पूनम योगेश निघुते यांच्या आत्महत्या प्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात आत्महत्येला प्रवृत्त केल्याबरोबरच हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांनी डॉ. पूनम यांचे पती डॉ. योगेश विभुते यांना या प्रकरणात आरोपी केले आहे. मयत पूनम यांच्या भावाने शहर पोलिस ठाण्यात बहिणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद दाखल केली आहे. गेल्या रविवारी (दि.२९) डॉ.पूनम योगेश निघुते यांनी आपल्या ताजणे मळा परिसरातील राहत्या घरात गळफास घेऊ न आत्महत्या केली होती.

त्यांच्या माहेरच्या लोकांनी याबाबत संशय व्यक्त केल्याने डॉ. पूनम यांचे शवविच्छेदन औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या माहेरी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल घाटी रुग्णालयाने दिला आहे. अंत्यविधी उरकल्यानंतर मृत पूनम यांचे बंधू शरद कमलाकर कोलते (वय ३२, रा.जूना जालना) यांनी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात डॉ. योगेश निघुते याच्या विरोधात तRार दाखल केली.

मृत डॉ. पूनम यांच्या भावाने गेल्या दहा वर्षांंपासून डॉ. योगेश हा आपल्या बहिणीला कशा पद्धतीने शारीरिक व मानसिक यातना देत होता याची माहिती या तRोर अर्जात दिली आहे. याशिवाय त्याच्या मागणीवरून तिच्या वडिलांनी वेळोवेळी बँक खात्यात भरलेल्या सुमारे साडेसात लाख रुपयांच्या रकमेचा तपशीलही फिर्यादीत देण्यात आला आहे. त्यावरून पोलिसांनी संगमनेरच्या बालरोगतज्ज्ञ असलेल्या डॉ.योगेश यशवंत निघुते याच्या विरोधात पैशांसाठी शारीरिक व मानसिक त्रास देऊन मारहाण करण्यासह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button