ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

डॉ. डी .वाय.पाटील युनिव्हर्सिटीमध्ये ‘फ्रेशमन ओरिएंटेशन प्रोग्राम ‘ चा प्रारंभ

१८ ऑगस्ट पर्यंत विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्रे

पुणे : डॉ. डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी (आंबी,पुणे) यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘आरंभ ‘या फ्रेशमन ओरिएंटेशन प्रोग्रॅमचे उदघाटन ९ ऑगस्ट २०२३ रोजी करण्यात आले .या उपक्रमाचे हे चौथे वर्ष आहे. ‘बार्कलेज’चे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण वुक्कलम,अदानी इलेक्ट्रिसिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिरुद्ध खेकाळे,’लुपिन लिमिटेड’ चे उपाध्यक्ष रितुराज सार,कर्नल सुनील भोसले,प्रा.कारंडे यांच्या उपस्थितीत झाले.डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटीच्या कुलगुरू डॉ.सायली गणकर यांनी स्वागत केले .१८ ऑगस्टपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.अभियांत्रिकी ,व्यवस्थापनशास्त्र,आर्किटेक्चर,फार्मसी, लॉ,डिझाईन आणि हॉटेल मॅनेजमेंट विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांचे स्वागत या कार्यक्रमातून करण्यात आले .विद्यार्थ्यांच्या कारकिर्दीची पायाभरणी होण्यासाठी आणि वैयक्तिक विकासाची, व्यक्तिमत्व विकासाची योग्य सुरुवात म्हणून या कार्यक्रमाचे नियोजन केले जाते .

अनिरुद्ध खेकाळे यांनी यशस्वी कारकिर्दीसाठी आवश्यक गोष्टींवर मार्गदर्शन केले.’आपल्या आवडीला उद्दिष्ट प्राप्त करून दिले तर कारकिर्दीला अर्थ प्राप्त होतो’,असे त्यांनी सांगितले.रितुराज सार म्हणाले,’अध्ययन करताना स्वतःचा ब्रँड निर्माण करण्याचे ध्येय समोर ठेवले पाहिजे.’प्रवीण वुक्कलम म्हणाले,’विद्यापीठाने उपलब्ध केलेल्या सर्व संधी आणि सुविधांचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे,स्वतःची गती ओळखून कार्यरत राहिले पाहिजे’.डॉ सायली गणकर म्हणाल्या,’यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रमाला आणि जबाबदारी घ्यायला पर्याय नसतो.आपण तशा तयारीने मेहनत घेतली पाहिजे’. इस्कॉन चे कृष्ण माधव दास यांनी मूल्य व्यवस्था,योग याविषयी मार्गदर्शन केले.प्रा.ओंकार समुद्र यांनी आभार मानले.

शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी वेगवेगळ्या क्षेत्रातील यशस्वी व्यक्तिमत्व,रोल मॉडेल त्यांच्यासमोर यावीत, यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. अँटिनार्कोटिक्सचे पोलीस उपनिरीक्षक सतीश पवार,आयटीसी इन्फोटेक चे प्रमोद हंकारे,डॉ.ज्योती जैन, प्राची कुलकर्णी, डॉ.संतोष राणे, ह्यासिंथ आर्या हे मार्गदर्शन करणार आहेत.दररोज १० ते ४ या वेळात ओरिएंटेशन प्रोग्राम पार पडणार आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button