breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

‘विवेकानंदांच्या विचारातून युवाशक्तीचा विकास शक्य’; डॉ अभय जेरे

पिंपरी(प्रतिनिधी)

भारतीय युवाशक्ती जर स्वामी विवेकानंदांचा आदर्श घेवून त्यांचे विचार आचरणात आणल्यास सर्व तरुणाईचा सर्वांगीण विकास होणे शक्य आहे. असे उदगार अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष डॉ अभय जेरे यांनी काढले.

आकुर्डी येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रोट्रॅक्ट क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “युवा- २० या शिखर” परिषदेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. विद्यार्थी दशेत सामाजिकतेचे धडे मिळावे या हेतूने डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमधे रोटरॅक्ट क्लब ची स्थापना २०२३ मध्ये करण्यात आली.

डॉ अभय जेरे पुढे म्हणाले कि, शैक्षणिक संस्था ज्ञान देऊ शकतात पण त्याचा सुयोग्य वापर युवकांच्या हातात आहे आणि त्यांनी तो योग्य प्रकारे करावा. नवीन संकल्पनेची गरज असताना जर तुम्ही आहे त्या पूर्वीच्या पद्धतीचा अवलंब करीत राहिलात तर ते समाजासाठी उपयुक्त ठरणार नाही. म्हणून नवीन संकल्पना अस्तित्वात आणता आल्या तर या शिखर परिषदेचे ध्येय साध्य होईल आणि या आयोजनाचा उद्देश सफल होईल.

स्मार्ट सिटीचे मुख्य ज्ञान अधिकारी दिनेश वीरकर म्हणाले कि , युवाशक्ती चा योग्य वापर देशाचे भविष्य घडवेल. तसेच त्यांनी स्टार्ट अप नवकल्पनांचा पुरस्कार केला आणि विविध क्षेत्रातील नवकल्पनांचा आवाका विशद केला. आणि विद्यार्थ्यांना स्टार्ट अप साठी आवाहन केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रिसर्च पार्क फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अरविंद शाळिग्राम म्हणाले की, विद्यापीठ नेहमी नवनिर्मितीचा, कल्पनांचा पुरस्कार करते. विद्यार्थ्यानी याचा लाभ घेऊन आपापल्या कल्पना स्टार्ट अपमध्ये प्रत्यक्षात आणाव्यात. स्टार्ट अप ही काळाची गरज आहे. असेही ते पुढे म्हणाले.

हेही वाचा – ‘हर घर तिरंगा’ संकल्पात चिनी गालबोट नको! भारत फ्लॅग फाउंडेशनचे आवाहन

दुपारच्या दरम्यान इंडस्ट्री 4.0, इनोव्हेशन, 21 व्या शतकातील कौशल्ये आणि स्टार्ट अप या विषावरच्या चर्चासत्रात मध्ये वक्ते, प्रशिक्षक जितेंद्र शर्मा, मायक्रो इनोटेक इंडिया प्रा.चे संस्थापक राजेश पवार,बांबू इंडियाचे संस्थापक योगेश शिंदे,ऑटो क्लस्टरचे पिंपरी चिंचवड स्टार्टअप इनक्युबेशन सेंटरचे व्यवस्थापक उदय देव,टॉर्क मोटर्सचे संस्थापक कपिल शेळके,कॅलफस इंकचे अमित बंसल, आयटी तज्ञ मनीष पोतदार

या प्रसिद्ध आणि प्रथितयश मान्यवरांनी पॅनेल चर्चासत्रात सक्रिय सहभाग घेतला. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नवीन संकल्पनेचा पुरस्कार करा आणि मिळालेल्या ज्ञानाचा वापर करून आपल्या पृथ्वीचा विकास करा असा सूर मान्यवरांनी आळवला. प्रा विपीन विभूते आणि डॉ मनीष शर्मा यांचा सहभाग महत्वाचा ठरला. रोटराक्ट क्लब चे अध्यक्ष अभिराम कुलकर्णी याच्या उत्तम नियोजनाने ही शिखर परिषद पार पडली.

या परिषदेचे सूत्रसंचालन प्रथमेश पवार,दिशा विसपुते,जिया रोशन आणि पवन धाईंजे या विद्यार्थ्यानी केले. या परिषदेत ४३५ विद्यार्थ्यानी आणि ११० शिक्षकांनी सहभागी झाले होते. यावेळी एस. बी. पाटील शाळेच्या 20 विद्यार्थ्यानी या डॉ अभय जेरे यांच्याशी संवाद साधला.

या कार्यक्रम आयोजनासाठी डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुल आकुर्डी चे संचालक रिअर अडमिराल(नि) अमीत विक्रम डी. वाय. पाटील प्रतिष्ठान चे विश्वस्त तेजस पाटील, तसेच प्रतिष्ठान चे अध्यक्ष सतेज डी. पाटील, कॉलेजच्या प्राचार्या डॉ पी मालती, उप प्राचार्य डॉ संदीप सरनोबत यांचे मार्गदर्शन लाभले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button