breaking-newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराष्ट्रिय

आकुर्डीच्या पवार कुटुंबाकडून पालखी दरम्यान सव्वा लाख चहाचे कप वाटप

निगडी : समाजातील विविध क्षेत्रांत अडचणीत सापडलेल्यांची आगळ्या वेगळ्या पद्धतीने मदत व सेवा करण्यात पुढाकार घेणारा अवलिया म्हणजे किशोर पवार होय. अगदी अडचणीत सापडलेला तरुण, असो की गरीब विद्यार्थी. बेरोजगार तरुणांना धंदा, नोकरीबाबत मार्गदर्शन, गरीब विद्यार्थ्यांना शाळेची फी, गणवेश व वह्या पुस्तकांची मदत करण्यापासून ते वारकऱ्यांची सेवा करण्यापर्यंत ते
सदैव पुढे असतात.
आताच पार पडलेल्या संत ज्ञानेश्वर माउली आणि तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना पंढरपूरपर्यंत पोचेपर्यंत त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी त्यांना चहा पाजण्याचे अनोखे काम त्यांनी पार पाडले. गंगानगर (आकुर्डी) येथील किशोर पवार यांनी वारीदरम्यान आकुर्डी ते पंढरपूर १३ दिवस सव्वा लाख मोफत चहाचे वाटप करून पांडुरंगाची आगळीवेगळी सेवा केली.

आकुर्डीत केटरिंगचा व्यवसाय करताना गंगानगरमध्ये दर वर्षी पालखीतील सुमारे २ हजार वारकऱ्यांना ते अन्नदान करतात. रोजच्या रोज चहा पुरवताना तारेवरची कसरत होत असे. मध्यरात्री २ वाजता उठून अंधारात पाणी व दुधासाठी भटकंती केल्यावर पहाटे ४ वाजेपर्यंत चहा वारकऱ्यांच्या हाती न पोचत असे. सकाळी ८ वाजेपर्यंत सुमारे ५ हजार वारकरी चहाने तृप्त होत. या वारीत सुमारे सव्वा लाख वरकऱ्यांनी चहाचा आनंद घेतला. पालखीसोबत असलेल्या ३५० दिंड्यांना वाटपासाठी पवार यांच्यासोबत एका टेंपोसह ५ सेवेकरी तैनात होते. पवार व सहकाऱ्यांनी अंधारात, रस्त्यावर खूप कष्टत १३ दिवस काढले. मात्र, सेवा केल्याने या सर्वांचा उत्साह अद्याप कमी झाला नव्हता. हे कार्य अखंडित सुरू ठेवणार असल्याचे पवार यांनी सांगितले. वारीत १३ दिवस सेवा चहाची तलफ कमीच भागवतअसलेल्या पवार यांनी पंढरपूरपर्यंत वारकऱ्यांना चहाचे वाटप करण्याचा संकल्प ९ वर्षापूर्वी केला. गेल्या वर्षी १३ दिवस चहाचे वाटप केले. तर यावर्षी १३ दिवस चहा देऊन वारकऱ्यांची तलफ भागवली. दररोज १० हजार वारकरी पवार यांच्या चहाचा आस्वाद घेत होते. यासाठी ५ क्विंटल साखर, ६५ किलो चहा पावडर,८४५ लिटर दूध तर दूध पावडर १०० किलो, इलायची ३ किलो लागली. कोरोना काळात दोन वर्षे वारी ऐवजी आषाढी एकादशी पोलीस स्टेशन, दवाखाने यांना चहाचे वाटप केले. कोरोंटाइन केलेल्या २ महिने रुग्णांची अन्नसेवा केली.

या कार्यासाठी अनुराग पवार,”किशोर पवार,”अरुणा पवार, “गजानन जोजारे,ज्ञानेश्वर पवार, राजू फडके यांचे सहकार्य लाभले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button