ताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडमुंबईराजकारणराष्ट्रिय

दिव्यांग युवकांना लाभले आत्मनिर्भरतेचे उडाण : आनंद बनसोडे

  • दिव्यांगांना आत्मनिर्भर बनविण्याचा उडाण दिव्यांग फाऊंडेशनचा संकल्प
  • जास्तीत जास्त दिव्यांगांना सहाय्य करण्याचा मनोदय

पिंपरी । शहरातील दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी तसेच आत्मनिर्भर बनविण्यासाठी उडाण दिव्यांग फाऊंडेशनच्यावतीने अर्थ सहाय्य तसेच व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात आले. मकरसंक्रातीनिमित्त उडान दिव्यांग फाउंडेशनने दिव्यांगांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी एक पाऊल टाकले! शहरातील दोन दिव्यांग बांधवांना व्यवसाय सुरू करून दिला. व्यवसायासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण देखील संस्थेमार्फत मोफत देण्यात आले. यामुळे दिव्यांग युवकांना आत्मनिर्भरतेचे उडाण मिळाले आहे. सदर उपक्रम फाउंडेशनच्या वतीने दिव्यांगांच्या कल्याणासाठी राबविण्यात येत आहे. येत्या सहा महिन्यात शहरातील शेकडो दिव्यांगांना अशा प्रकारे आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने फांउंडेशनची वाटचाल असणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष आनंद बनसोडे यांनी दिली.

15 जानेवारी मकरसंक्रांत सणानिमित्त उडान दिव्यांग फाउंडेशन, पुणे यांच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवड शहरातील दिव्यांग बांधव केशव कळसकर उर्फ KK सर व सचिन तुरुकमारे यांना फाउंडेशनच्यावतीने व्यवसाय सुरू करून देण्यात आला. व्यवसायासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षणदेखील संस्थेमार्फत मोफत देण्यात आले. एक सर्वसामान्य दिव्यांग बांधवदेखील स्वतःच्या पायावर उभा राहून स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकतो. हे यानिमित्त पहायला मिळाले.

काळेवाडी डी मार्ट, एम एम कॉलेज जवळ केशव कळसरकर यांना तसेच नेहरूनगर रोड, डी वाय पाटील हॉस्पिटल जवळील महेश नगर बस स्टॉप येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सचिन तुरुकमारे यांना मोबाईल असेसरीजचा स्टॉल टाकून देण्यात आला. तर यासाठी उडाण फाऊंडेशनच्यावतीने अर्थसहाय्य तसेच व्यावसायिक प्रशिक्षणदेखील देण्यात आले.

या कार्यक्रमास उडाण फाऊंडेशनचे अध्यक्ष आनंद बनसोडे, सचिव बाळासाहेब तरस, उपाध्यक्ष योगेश सोनार, खजिनदार रवी भिसे, कार्याध्यक्ष श्री महम्मद शफी पटेल व इतर दिव्यांग मंडळी उपस्थित होते.

येत्या काही दिवसांत शहरातील जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर करण्याच्यादृष्टीने आमच्या उडाण फाउंडेशनची वाटचाल असणार आहे. शहरवासियांना आम्ही नम्र आवाहन करतो की, आपण मॉल, मोठमोठी दुकाने या ठिकाणाहून कोणतीही वस्तू खरेदी न करता अशा दिव्यांग बाधवांकडून छोटी-मोठी वस्तू खरेदी केल्यास दिव्यांग बांधवांनादेखील सहाय्य होईल. त्यांचा व्यवसाय होईल. त्यांचे उदरनिर्वाहाच्या व्यवसायाला हातभार लागेल.
-आनंद विष्णू बनसोडे, अध्यक्ष, उडान दिव्यांग फाउंडेशन

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button