Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

उपमुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवारी) प्रथमच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट

मुंबई: उपमुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवारी) प्रथमच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. फडणवीस यांनी शिवतीर्थावर ठाकरे यांची भेट घेतली.

राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यानंतर राज ठाकरे यांनी नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या होत्या. त्याआधी राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतल्याने ते भाजपच्या बाजूने झुकल्याची चर्चा होतीच. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर त्यात मनसेला देखील वाटा मिळेल अशी चर्चा सुरू झाली होती. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना मंत्रिपद दिले जाईल असे वृत्त समोर येत होते. अशाच आजच्या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली यावर अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत.

कालची बातमी खोटी होती…

दरम्यान राज्य मंत्रिमंडळात अमित ठाकरेंचा समावेश केला जाईल ही बातमी खोटी होती असे राज ठाकरे यांनी या भेटीत पुन्हा एकदा स्पष्ट केले.

राज्यातील सत्तांतरनंतर झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी भाजपच्या राहुल नार्वेकर यांना मत दिले होते. तर राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीसांना कौतुक करणारे पत्र पाठवले होते.

राज ठाकरेंवर झाली होती शस्त्रक्रिया

गेल्या महिन्यातच राज ठाकरेंवर हिपबोनची शस्त्रक्रिया झाली होती. त्या पार्श्वभूमीवरच फडणवीस यांनी ठाकरेंची सदिच्छा भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. पण या भेटीच्या निमित्ताने राजकीय चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. विशेषत: आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर चर्चा झाली अधिक शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button