breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्यामागे ‘लष्कर-ए-तोयबा’

जम्मू : गेल्या महिन्यात अमरनाथ यात्रेकरूंवर झालेला दहशतवादी हल्ला हा ‘लष्कर-ए-तोयबा’ या दहशतवादी संघटनेने केल्याचे स्पष्ट झाले आहे. जम्मू-काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक मुनीर खान यांनी ही माहिती दिली आहे. या हल्ल्यातील ३ आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्व दहशतवाद्यांची ओळख पटली असून लवकरच या हल्ल्याच्या मास्टरमाइंडसह उर्वरीत दहशतवाद्यांनाही पकडले जाईल असे खान यांनी स्पष्ट केले आहे.
अबू इस्माइल हा अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे अशी माहितीही मुनीर खान यांनी दिली आहे. इस्माइलसह इतर ३ दहशतवादी फरार आहेत. अटक करण्यात आलेल्या ३ दहशतवाद्यांचा हल्ल्याचा कट रचण्यात आणि हल्लेखोरांना मदत करण्यात सहभाग होता.
हा हल्ला एकूण ३ दहशतवाद्यांनी घडवून आणल्याचे मुनीर खान यांनी सांगितले. या तिघांपैकी २ पाकिस्तानचे, तर एक काश्मिरी दहशतवादी होता. हा हल्ला योजनाबद्ध असल्याचेही ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button