breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

महापौर निधीतून खरेदी केलेल्या दोन रुग्णवाहीका व रक्तपेढीकरीता एक मिनीबस लोकार्पण

पिंपरी – शहरातील कोरोना परिस्थिती आणि कार्डीयाक रुग्णवाहीकेची कमतरता विचारात घेवून आमदार लक्ष्मण जगताप यांचे मार्गदर्शनाखाली महापौर निधीतून नागरीकांकरीता दोन रुग्णवाहीका आणि रक्तपेढीकरीता एक मिनीबस खरेदी करुन आज लोकार्पण करण्यात आली आहे असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले.
महापौर निधीतून कोरोनाबाधित रुग्णांकरीता दोन कार्डीयाक रुग्णवाहीका आणि रक्तपेढीकरीता एक मिनीबस लोकार्पण आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते आज पार पडले त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी आमदार महेश लांडगे, उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती नितिन लांडगे, मनसे गटनेते सचिन चिखले, आयुक्त राजेश पाटील, नगरसदस्य अंबरनाथ कांबळे, शशिकांत कदम, माजी नगरसदस्य शंकर जगताप, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, वायसीएम रूग्णालयाचे आधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, माहिती व जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.
कार्डीयाक रुग्णवाहीकांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटीलेटर करीता व्यवस्था, स्ट्रेचर तसेच स्टोअरेजची सोय असुन त्या वातानुकूलीत आहेत. दोन रुग्णवाहीका खरेदीसाठी ४३ लाख ९२ हजार इतका खर्च आलेला आहे. तर २५ आसन क्षमतेच्या वातानुकूलीत मिनीबसमध्ये रक्तपेढीचे साहित्य तसेच रक्तसंकलन अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रवासाकरीता सोय करण्यात आलेली आहे. या बसच्या खरेदीसाठी २२ लाख इतका खर्च आलेला आहे.
२०२१- शहरातील कोरोना परिस्थिती आणि कार्डीयाक रुग्णवाहीकेची कमतरता विचारात घेवून आमदार लक्ष्मण जगताप यांचे मार्गदर्शनाखाली महापौर निधीतून नागरीकांकरीता दोन रुग्णवाहीका आणि रक्तपेढीकरीता एक मिनीबस खरेदी करुन आज लोकार्पण करण्यात आली आहे असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले.
महापौर निधीतून कोरोनाबाधित रुग्णांकरीता दोन कार्डीयाक रुग्णवाहीका आणि रक्तपेढीकरीता एक मिनीबस लोकार्पण आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते आज पार पडले त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी आमदार महेश लांडगे, उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती नितिन लांडगे, मनसे गटनेते सचिन चिखले, आयुक्त राजेश पाटील, नगरसदस्य अंबरनाथ कांबळे, शशिकांत कदम, माजी नगरसदस्य शंकर जगताप, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, वायसीएम रूग्णालयाचे आधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, माहिती व जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.
कार्डीयाक रुग्णवाहीकांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटीलेटर करीता व्यवस्था, स्ट्रेचर तसेच स्टोअरेजची सोय असुन त्या वातानुकूलीत आहेत. दोन रुग्णवाहीका खरेदीसाठी ४३ लाख ९२ हजार इतका खर्च आलेला आहे. तर २५ आसन क्षमतेच्या वातानुकूलीत मिनीबसमध्ये रक्तपेढीचे साहित्य तसेच रक्तसंकलन अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रवासाकरीता सोय करण्यात आलेली आहे. या बसच्या खरेदीसाठी २२ लाख इतका खर्च आलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button