TOP Newsपिंपरी / चिंचवड

“दत्ताकाका आजही आमच्यासोबत कायम आहेत”.. मोरेवस्तीतील नागरिकांच्या भावना

रक्तदानातून स्व. दत्ताकाका साने यांना अभिवादन

पिंपरी-चिंचवड । महान्यूज । विशेष प्रतिनिधी ।

स्व. दत्ताकाका साने प्रतिष्ठान आणि वीर अभिमन्यू फ्रेंड्स सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष यश साने यांच्या पुढाकारातून माजी नगरसेवक स्व. दत्ताकाका साने यांच्या जयंतीनिमित्त अंगणवाडी चौकातील महापालिका शाळेत रक्तदान शिबिरासह आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांस राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार, पारनेरचे आमदार निलेश लंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, माजी नगरसेवक रवी लांडगे, शहर उपाध्यक्ष आतिश बारणे, राष्ट्रवादी ओबीसी सेल शहराध्यक्ष विजय  लोखंडे, संगीता ताम्हाणे, पंकज भालेकर, धनंजय भालेकर, संजय नेवाळे,  निलेश लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते विकास साने, रावसाहेब थोरात, सचिन सानप आदींसह ल विविध क्षेत्रातील पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

आरोग्य शिबिराला स्थानिक नागरिकांचा उदंड प्रतिसाद

या आरोग्य शिबिरात आरोग्य क्षेत्रातील विविध संस्थांनी स्वयंस्फूर्तीने नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्याची तयारी दाखविली. यामध्ये १५१ दात्यांनी रक्तदान केले. १८९ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. यातील ३५ नागरिकांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले. त्यातील १२ नागरिकांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. तर ९८ नागरिकांची रक्त तपासणी आणि २२० नागरिकांच्या संपूर्ण शरीराची मोफत तपासणी करण्यात आली.

दरम्यान, दत्ताकाका साने यांची जयंती असो किंवा पुण्यतिथी यानिमित्त आयोजित समाजोपयोगी उपक्रमांना चिखली – मोरेवस्ती परिसरातील  नागरिकांची मोठी उपस्थिती असते. कारण काकांची नाळ जनतेशी जोडलेली होती. त्यांच्या अकाली  निधनानंतरही याची प्रचिती येत आहे. काका आमच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी असायचे. कुटुंबप्रमाणे आमचे प्रश्न सोडवायचे. ते असताना आम्हाला मोठा आधार होता. मात्र, आता यश हेच काकांचा समाजसेवेचा वारसा समर्थपणे पुढे नेत आहेत.  त्यामुळे आम्हाला यशच्या रूपाने काका आजही आमच्यासोबत असल्याची जाणीव होत असते, असे स्थानिक नागरिकांनी  सांगितले.

पवार कुटुंबीयांनी जपले विश्वासाचे नाते

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषी मंत्री  शरद पवार,  विरोधी पक्षनेते अजितदादा पवार,  खासदार सुप्रिया  सुळे, आमदार रोहितदादा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थदादा पवार यांचे आणि स्व. दत्ताकाका साने यांचे अतिशय जिव्हाळ्याचे आणि विश्वासाचे नाते होते. पिंपरी चिंचवड शहरातून राष्ट्रवादीची सत्ता गेली तरीही दत्ताकाका पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादीसोबत  शेवटच्या श्वासापर्यंत कायम होते. दत्ताकाका यांचे निधन झाल्यानंतर पवार कुटुंबातील प्रत्येक नेत्याने  चिखली येथील साने कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच दत्ताकाका यांचे चिरंजीव यश आणि साने कुटुंबाला भक्कम आधार दिला. यश यांच्यावर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारीही सोपविली. तसेच दत्ताकाका यांची जयंती आणि पुण्यतिथीच्या कार्यक्रमांना पवार कुटुंबातील सदस्य आवर्जून उपस्थित असतात. यावरून पवार कुटुंबीयांनी  दत्ताकाका यांच्यासोबत असलेले विश्वासाचे नाते आजही जपले असल्याचे पाहायला मिळत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button