breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहिला दिन

जागतिक महिला दिन : घरातील महिला सक्षम ,तर कुटुंब सक्षम: नगरसेविका अनुराधाताई गोरखे

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

आजच्या महिलांनी स्वतः प्रथम आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊन स्वतःला सक्षम होणे गरजेचे आहे. कुटुंबातील एक महिला सक्षम असेल, तर ते संपूर्ण कुटुंब सक्षम बनते, असे प्रतिपादन नगरसेविका अनुराधाताई गोरखे यांनी व्यक्त केले.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने प्रभाग १० मधील दत्तनगर, विद्यानगर परिसरातील कष्टकरी महिलांसाठी आज एक दिवसीय व्यवसाय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन नगरसेविका अनुराधा गोरखे व फॉर्म व त्यांच्या फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. अनुराधाताई गोरखे पुढे म्हणाल्या की,  प्रत्येक महिले मध्ये काहीना काही गुण असतो तो त्यांनी स्वतः शोधला पाहिजे. आपली आवड जोपासली पाहिजे व आपल्याला काय नेमकं आवडतं याची निवड करून त्यामध्येच छोटे-मोठे उद्योग व्यवसाय चालू केले पाहिजेत. आज घर बसल्या पापड लाटणे लोणची करणे, कागदी पिशव्या तयार करणे, यासारखे अनेक व्यवसाय आहेत. जे आपण करू शकतो. त्यासाठी फक्त त्या महिलेची आत्मीय शक्ती जागृत होणे गरजेचे असते व ती जागृत होण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षणाव्ददारे प्रयत्न केला जात आहे.
या कार्यक्रमात निवृत्त अधिकारी वैजनाथ पापुले यांनी महिलांना विविध घरगुती व्यवसाय कसा करावा या विषयी मार्गदर्शन केले. विविध प्रकारच्या कागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण, या वेळी त्यानी दिले, तसेच महिलांचे आरोग्य, स्वच्छतां ,करोना व्हायरसबाबत घ्यावयाची काळजी या विषयीची डॉ. मानसी पाटील यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी माजी नगरसेविका जयश्री वाघमारे,  आशा गायकवाड उपस्थित होत्या. अनुसूचित मोर्चाच्या कोमल शिंदे यांनी सूत्रसंचलन केले..

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button