breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमनोरंजनमहाराष्ट्रराष्ट्रिय

गौतमी पाटील अश्लील डान्समुळे पुन्हा अडचणीत?

नृत्यांगना मृणाल कुलकर्णीने गौतमी पाटीलला सुनावले खडे बोल

पुणे : गौतमी पाटीलच्या नृत्यावर आक्षेप घेत मृणाल कुलकर्णी यांनी देखील गौतमी विरोधात साताऱ्यात तक्रार दाखल केली आहे. कलावंताने आपली मर्यादा पाळायला हवी. लावणीकडे पाहण्याचा सर्वांचाच दृष्टीकोन फार वेगळा आहे. मात्र जर कोणी या प्रकारचं कृत्य करत असेल तर दुर्दैवाने कलावंताविरोधात तक्रार दाखल करावी लागते, असं मृणाल कुलकर्णीने गौतमी पाटीलला सुनावले आहे.

गौतमी पाटीलने लावणी करताना अश्लील कृत्य आणि हातवारे न करण्याचा सल्ला देताना मृणाल कुलकर्णी म्हणाली, गौतमी पाटीलमुळे लावणीवर बंदी घालण्यात येत आहे. ज्यांची पोट याच्यावर आहेत त्यांचं नुकसान होऊ नये. लावणी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. ती कला जोपासण्याचं काम आम्ही करत आहोत, असं मृणाल म्हणाली.

गौतमी पाटीलच्या अश्लील कृत्यामुळे तिच्यावर गुन्हे दाखल होत आहेत, असे खडे बोल नृत्यांगना मृणाल कुलकर्णीने गौतमी पाटीलला सुनावले आहेत.

गौतमी पाटीलने केलेल्या अश्लील कृत्यांबद्दल माफी मागते. मात्र वारंवार तेच दृश्य समोर येत आहे. गौतमी पाटील ही माझी वैरी नाही. मात्र, झटपट प्रसिद्धीसाठी गौतमी करत असलेले चाळे बंद करावेत, असंही मृणाल कुलकर्णी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button