TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

राज्यात लवकरच सायबर गुप्तचर विभाग

मुंबई : सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी राज्यात लवकरच ‘समर्पित सायबर गुप्तचर विभाग’ स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी हरयाणातील सुरजकुंड येथील चिंतन शिबिरात दिली.  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेत देशभरातील विविध राज्यांचे गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांचे दोन दिवसांचे चिंतन शिबीर सुरजकुंड येथे पार पडले. या बैठकीत बोलताना फडणवीस यांनी सायबर गुप्तचर हा एक समर्पित विभाग असेल असे सांगितले.

सायबर गुप्तचर विभागाच्या माध्यमांतून सायबर गुन्ह्यांना आळा घालणारे जागतिक ‘मॉडेल’ तयार होईल. सरकारी आणि खासगी बँका, वित्तीय संस्था, सोशल मीडिया संस्था, नियामक संस्था, सायबर पोलीस, तंत्रज्ञ असे सर्व या व्यासपीठावर एकत्रित राहणार असून, त्यातून गतिमान प्रतिसादाची यंत्रणा उभारण्यात येणार आहे. यात आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर असेल. अलीकडच्या काळात आर्थिक आणि सायबर गुन्हे मोठय़ा प्रमाणात वाढले आहेत. अन्य गुन्ह्यांच्या तुलनेत येणाऱ्या काळात कदाचित या गुन्ह्यांचीच संख्या अधिक असेल. मात्र राज्यात उभारण्यात येणारी ही नवी संस्था आधीच त्या दृष्टीने सज्ज असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button