breaking-newsताज्या घडामोडीपुणे

CTET 2020: अर्ज भरण्यास मुदतवाढ

पुणे |महाईन्यूज|

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच CTET परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत २४ फेब्रुवारी होती, ती आता वाढवून २ मार्च २०२० करण्यात आली आहे. परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत ५ मार्च दुपारी ३ वाजेपर्यंत आहे.

या परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २४ जानेवारी २०२० रोजी सुरू झाली होती. २४ फेब्रुवारीला अर्ज करण्याची मुदत संपणार होती, पण ती वाढवण्यात आली आहे. आता इच्छुक उमेदवारांना २ मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहे. शुल्क भरण्याची मुदत २७ फेब्रुवारी २०२० आहे. CTET 2020 परीक्षा ५ जुलै २०२० रोजी आहे.

अर्ज कसा भरायचा?

  • CTET च्या अधिकृत संकेतस्थळावर ctet.nic.in वर जा
  • Apply Online लिंकवर क्लिक करा
  • ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्म भरा आणि नोंदणी नंबर नोट करून ठेवा.
  • स्कॅन केलेला फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा
  • पेमेंट करा
  • कन्फर्मेशन पेज आलं की त्याचं प्रिंटआऊट घ्या

अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा

शुल्क – खुल्या गटासाठी एका पेपरसाठी एक हजार रुपये, दोन्ही पेपरसाठी १२०० रुपये. आरक्षित गटासाठी अनुक्रमे ५०० आणि ६०० रुपये. ऑनलाइन पेमेंट डेबिट, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे करतायेईल. चलानद्वारे पेमेंट करावयाचे असल्यास सिंडिकेट बँक किंवा कॅनरा बँकेमार्फतच होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button