पिंपरी / चिंचवड

सराईत गुन्हेगाराला शस्त्रासह अटक

पिंपरी l प्रतिनिधी

तडीपार केलेल्या सराईत गुन्हेगाराला निगडी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक चाकू जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 20) सायंकाळी पावणे पाच वाजता राहुलनगर ओटास्कीम येथे करण्यात आली.

आदर्श उर्फ छोट्या अशोक मगर (वय 22, रा. राहुलनगर, ओटास्कीम, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक राहुल मिसाळ यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आदर्श याला 6 जानेवारी 2021 पासून दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात आला. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी सापळा लावून आदर्श याला राहुलनगर ओटास्कीम येथून रविवारी सायंकाळी ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे चाकू आढळला. पोलिसांनी चाकू जप्त करून आदर्श याला अटक केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button