पिंपरी / चिंचवड

रावेत येथे सामाजिक सुरक्षा पथकाची कारवाई : 26 हजारांचा गुटखा जप्त

पिंपरी l प्रतिनिधी

रावेत येथे एका किराणा मालाच्या दुकानात सामाजिक सुरक्षा पथकाने छापा मारून कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी 26 हजार 570 रुपयांचा गुटखा जप्त केला. ही कारवाई रविवारी (दि. 20) दुपारी अडीच वाजता करण्यात आली.

पोलीस नाईक भगवंत मुठे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शैतानराम रावाराम देवासी (वय 20, रा. रावेत) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत येथील महादेव सुपर मार्केटमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विकला जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीसांनी रविवारी दुपारी दुकानावर छापा मारून कारवाई केली. यात पोलिसांनी 26 हजार 570 रुपयांचा गुटखा जप्त करत आरोपीला अटक केली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button