breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#COVID19: मावळ तालुक्यात आमदार सुनील शेळक यांचा ‘मदत कक्ष’

मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबांना महिनाभराचे अन्न-धान्य देणार

मावळ । महाईन्यूज । प्रतिनिधी

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यमुळे सर्व उद्योगधंदे, रोजगार निर्मितीची साधणे बंद आहेत. परिणामी, सर्वसामान्य कुटुंब आणि मोलमजुरी करणाऱ्या नागरिकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मावळ तालुक्यातील कोणीही व्यक्ती उपाशी राहू नये. यासाठी तालुकास्तराव मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दिली.

या उपक्रमाच्या माध्यमातून तालुका प्रशासन आणि मिळालेला मदत निधी एकत्रिक करून आर्थिकदृष्या दुर्बल घटकांतील कुटुंबियांना एक महिना पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तू देण्यात येणार आहेत. त्यासाठी मावळ तालुक्यातील सामाजिक स्वयंसेवी संस्था, मंडळे आणि दानशूर व्यक्ती यांना आवाहन करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button