breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सहृद्यी राजकारणी, सामाजिक स्थित्यंतराचा चालता-बोलता विश्वकोष काळाच्या पडद्याआड ! – सुप्रिया सुळे

मुंबई- भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे आज निधन झाले. मागच्या दोन महिन्यांपासून ते एम्स रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. वयाच्या ९४वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

किडनी संसर्गामुळे अटल बिहारी वाजपेयी यांना ११ जून रोजी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी रात्री एम्सने जारी केलेल्या बुलेटीननुसार, वाजपेयींची प्रकृती मागील २४ तासात चिंताजनक होती.

दरम्यान, अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या ” माजी पंतप्रधान, सहृद्यी राजकारणी, सर्वोत्तम संसदपटू भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे देशाच्या राजकीय आणि सामाजिक स्थित्यंतराचा चालता-बोलता विश्वकोष काळाच्या पडद्याआड गेला. भावपूर्ण श्रद्धांजली.”

Supriya Sule

@supriya_sule

माजी पंतप्रधान, सहृद्यी राजकारणी, सर्वोत्तम संसदपटू भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे देशाच्या राजकीय आणि सामाजिक स्थित्यंतराचा चालता-बोलता विश्वकोष काळाच्या पडद्याआड गेला. भावपूर्ण श्रद्धांजली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button