breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

#Covid-19: RBIची परीक्षा देण्यासाठी औरंगाबादला गेलेल्या नगरच्या तरुणाची निर्घृण हत्या

मुंबई |

अहमदनगरच्या एका तरुणाची औरंगाबादमध्ये निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे त्याचा मृतदेह एक हात नसलेल्या अवस्थेत आढळला. आज (दि.९) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची लिपीक पदाची परिक्षा देण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मृतदेह औरंगाबाद शहरातील कब्रस्तानात आढळला. विकास देवीचंद चव्हाण (२३, रा. पाथर्डी, नगर) असं मृत तरुणाचं नाव असून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली.

ही घटना आज सकाळी उघडकीस आली. विकास हा भारतीय रिझर्व्ह बॅंकेची लिपीक पदाची परीक्षा देण्यासाठी नगरच्या पाथर्डीहून औरंगाबादला गेला होता. पण, आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास कब्रस्तानात त्याचा मृतदेह आढळला. मारेकऱ्यांनी विकासचा एक हात कोपरापासून तोडला होता. स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना देताच तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर घटनास्थळावरुन मृतदेहाचा तोडलेला हातही पोलिसांना सापडला असून पोलिस घटनेचा सखोल तपास करत आहेत. तर, मृतदेह घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मृत विकास पाथर्डीजवळील हरि तांडा येथील रहिवासी होता.

वाचा- #Covid-19: स्वत:चं पोट उपाशी ठेवून शेजाऱ्याला लस- उपमुख्यमंत्री अजित पवार

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button