breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

#Covid-19: करोनाकहर सुरू असताना दिल्लीत भाजप अदृश्य!

नवी दिल्ली |

दिल्लीत करोनाने थैमान घातले असताना मदतकार्यात सक्रीय सहभाग नसल्याच्या मुद्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्ली प्रांत कार्यकारिणीच्या एका सदस्याने दिल्ली भाजपवर जोरदार टीका केली आहे. ‘दिल्लीत सगळीकडे आग लागली आहे. अशा वेळी कुणा दिल्लीवाल्याने भाजपवाल्यांना पाहिले आहे का?’ असा प्रश्न संघाचे कार्यकारिणी सदस्य राजीव तुली यांनी ट्विटरवर विचारला. ‘भाजप दिल्लीत कुठे आहे?’ असे संघाच्या दिल्ली शाखेचे माजी प्रांत प्रचारप्रमुख असलेले तुली यांनी लिहिले आहे. याबाबत प्रतिक्रियेसाठी केलेल्या दूरध्वनी आणि संदेशांना त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

याबाबत दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांना विचारले असता, आपण तुली यांना ओळखत नाही किंवा त्यांच्या ट्वीटबद्दलही माहिती नाही, असे त्यांनी सांगितले. आपल्याला तुली यांच्या ट्वीटबाबत काहीही बोलायचे नाही, असे भाजपच्या दिल्ली शाखेचे सरचिटणीस हर्ष मल्होत्रा म्हणाले. ‘२१ एप्रिलपासून ३ हेल्पलाइन क्रमांक २४ तास कार्यरत आहेत. त्याद्वारे दोन प्रकारची कामे सुरू आहेत. ‘डॉक्टर ऑन कॉल’द्वारे डॉक्टरांचे एक पॅनेल रुग्णांची फोनवर काळजी घेत आहेत, तर दुसरी रुग्ण व त्यांच्या कुटुंबासाठी अन्नाची व्यवस्था करत आहे’, असे त्यांनी सांगितले. आमच्या माध्यमातून दररोज ३१२१ कुटुंबांना अन्न मिळत असून, १०२५ हून अधिक रुग्णांवर डॉक्टर उपचार करत आहेत. याशिवाय १३ साामूहिक स्वयंपाकघरे सुरू आहेत, अशीही माहिती मल्होत्रा यांनी दिली. मात्र तुली यांच्या ट्वीटमुळे, करोनाच्या हाताळणीबाबत संघ परिवारात वाढणारा असंतोष व्यक्त झाला आहे. दिल्लीत संघटना म्हणून आमचे अस्तित्व दिसत नाही, असे एका भाजप नेत्याने तुलींच्या वक्तव्याचे समर्थन करताना सांगितले. दिल्लीत सर्वत्र आग लागली असताना कुणी भाजपवाल्यांना पाहिले आहे का? दिल्ली भाजप आहे कुठे? दिल्ली भाजप कार्यकारिणी विसर्जित झाली आहे का? – राजीव तुली

वाचा- #Covid-19: ‘करोना धोरणाचा आराखडा’ देण्याचे केंद्राला निर्देश

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button