breaking-newsपिंपरी / चिंचवड

#Covid 19 : रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी महापालिका नागरिकांना देणार ‘जीवनसत्व व कॅल्शियमयुक्त’ गोळ्या

पिंपरी| महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता प्रभावी उपाययोजनांच्या दृष्टीने शहरातील ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी जीवनसत्व व कॅल्शियमयुक्त गोळ्यांचा मोफत पुरवठा करण्याबाबत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी आज पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनास सूचना दिल्या.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कोरोना (कोविड – १९) विषाणूंचा प्रादुर्भाव आणि संसर्गाचा असणारा सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिक व गरोदर स्त्रियांना अधिक प्रमाणात असल्याचे वैद्यकिय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. त्यादृष्टीने महापालिकेने विविध पातळ्यांवर नियोजन व व्यवस्थापन केले आहे. त्याअंतर्गत शहरातील ज्येष्ठ नागरिकांना बी कॉम्प्लेक्स जीवनसत्वयुक्त गोळया तसेच गरोदर महिलांसाठी लोहयुक्त आणि कॅल्शियमच्या गोळयांचा मोफत पुरवठा करण्याच्या सुचना महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी महानगरपालिका प्रशासन व वैद्यकिय विभागास दिल्या.

तसेच महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ज्या ज्येष्ठ नागरिकांना सर्दी, ताप, खोकला व इतर कोरोनासदृश्य लक्षणे आढळून आल्यास त्यांनी तात्काळ नजीकच्या महापालिका रुग्णालय अथवा दवाखान्यांमध्ये वैद्यकिय तपासणी करुन घेण्यासंबंधीचे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले. शहरातील ज्येष्ठ नागरिक संघांनी याबाबत पुढाकार घेऊन लक्षणे दिसणा-या संबंधित ज्येष्ठांना वैद्यकिय तपासणी व उपचाराकामी मार्गदर्शन करावे असे आवाहनही यानिमित्ताने महापौरांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button