breaking-newsआंतरराष्टीय

#CoronoVirus:213 देशांमध्ये 76 लाख लोकांना कोरोनाची लागण

जगभरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत 1 लाख 36 हजार नवे कोरोना बाधित आढळून आले असून मृतांचा आकडा 4946 ने वाढला आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात आतापर्यंत जवळपास 75 लाख 83 हजार लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी 4 लाख 23 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 38 लाख 35 हजार लोकांना संसर्ग झाला आहे. जगभरातील जवळपास 60 टक्के रुग्ण फक्त 8 देशांमध्ये आहेत. या देशांमध्ये कोरोना बाधितांची संख्या 45 लाख एवढी आहे.

कोरोनाचा सर्वाधिक कहर अमेरिकेत दिसून आला आहे. अमेरिकेमध्ये 21 लाख लोकांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. एक लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतु, सध्या कोरोनाचं नवं केंद्र ब्राझील असल्याचं समोर येत आहे. ब्राझीलमध्ये अमेरिकेपेक्षा जास्त कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात येत आहे. गेल्या 24 तासांमध्ये ब्राझीलमध्ये 30,465 नवे कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत, तर 1261 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अमेरिकेत गेल्या 24 तासांत 23283 नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर 899 लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. ब्राझीलनंतर रूस आणि भारतात कोरोना बाधितांची संख्या जगभरात सर्वाधिक आहे.

अमेरिका : एकूण रुग्ण 2,089,684, एकूण मृत्यू 116,029
ब्राजील : एकूण रुग्ण 805,649, एकूण मृत्यू 41,058
रूस : एकूण रुग्ण 502,436, एकूण मृत्यू 6,532
भारत : एकूण रुग्ण 298,283, एकूण मृत्यू 8,501
यूके : एकूण रुग्ण 291,409, एकूण मृत्यू 41,279
स्पेन : एकूण रुग्ण 289,787, एकूण मृत्यू 27,136
इटली : एकूण रुग्ण 236,142, एकूण मृत्यू 34,167
पेरू : एकूण रुग्ण 214,788, एकूण मृत्यू 6,109
जर्मनी : एकूण रुग्ण 186,795, एकूण मृत्यू 8,851
इराण : एकूण रुग्ण 180,156, एकूण मृत्यू 8,584

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button