breaking-newsराष्ट्रिय

गीरच्या जंगलात 20 दिवसात 21 सिंहांचा मृत्यू

गीर– आशियातील सिंहांचे एकमेव आश्रयस्थान असणाऱ्या गीरमधील 21 सिंहांचा गेल्या 20 दिवसात मृत्यू झाला आहे. हे सगळेच सिंह अकस्मात आजारी पडून मृत पावले पण त्यांच्या आजाराची कारणं मात्र स्पष्ट झालेली नाहीत. सिहांसाठी प्रसिद्ध असलेल्या गीर जंगलात 20 सप्टेंबरपासून आतापर्यंत अनेक सिंहांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी वनविभागाने जसधर पशु सेवा केंद्रातील अजून 11 सिंहांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. यासोबत मृत सिंहांचा आकडा 21 वर पोहोचला आहे. एका धोकादायक व्हायरसमुळे सिंहाचा मृत्यू होत असल्याचं सांगितलं जात आहे. याच व्हायरसमुळे तंजानिया येथे 1994 मध्ये एक हजार सिंहांचा मृत्यू झाला होता.
12 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर दरम्यान गीरमधील दालखानिया परिसरातील 10 सिंहांचा अकस्मात मृत्यू झाला. त्यानंतर याच भागात आणखी दहा सिंह अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आढळले . या सिंहांना उपचारासाठी जसधर ऍनिमल केअर सेंटरला नेण्यात आले. तेथे या सर्व सिंहांचा अवघ्या 10 दिवसांत मृत्यू झाला. या 21ही सिंहांचे रक्त पुण्याच्या नॅशनल व्हायरॉलॉजी संस्थेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मेलेल्या 21 पैकी चार सिंहांना सीडीव्ही व्हायरसची लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हा व्हायरस कुत्र्यांमधून सिंहांपर्यंत पोहोचला. टान्झानियामध्ये हा व्हायरस 1994 मध्ये पसरला होता आणि त्यामुळे सिंहांची एक प्रजातीच नष्ट झाली होती. तर इतर सिंहांचा मृत्यू याच व्हायरसने झाला आहे की नाही हे मात्र अजून स्पष्ट झालेले नाही. या भागातील उर्वरित 31 सिंहांना वाचवण्यासाठी तात्पुरतं जामवाला रेस्क्‍यू सेंटरला हलवण्यात आलं आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button