breaking-newsआंतरराष्टीय

#CoronoVirus:दोन बलाढ्य देश कोरोना विषाणू संसर्गासमोर हतबल

वॉशिंग्टन / लंडन. अमेरिकेत काेराेना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. ब्रिटनचीही स्थिती फारशी वेगळी नाही. ब्रिटनमध्ये बरे हाेण्याचे प्रमाण ०.२० टक्के एवढेच आहे. अमेरिकेत आतापर्यंत काेराेनाचे ११ लाख ३१ हजार ८५६ रुग्ण आढळून आले. येथे ६५ हजार ७८२ जणांचा मृत्यू झाला, तर १ लाख ६१ हजार ६६६ रुग्ण बरे झाले. मात्र रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. २७ एप्रिलला येथे २३ हजार १९६ नवे रुग्ण समाेर आले हाेते. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून ही संख्या वाढत गेली. दरराेज नव्या रुग्णांची संख्या २५ हजारांहून जास्त हाेती. १ मे राेजी पाच दिवसांत सर्वाधिक ३६ हजार ७ झाली हाेती. त्याचाच अर्थ संसर्गाचे प्रमाण ५५ टक्के वाढले. मृत्यूचा दर कमी-अधिक झाला. २७ एप्रिलला येथे १ हजार ३८३ जणांचा मृत्यू झाला हाेता. त्याच्या पाच दिवसांनंतर सर्वाधिक २ हजार ४७० व १ मे राेजी १८९७ जणांचा मृत्यू झाला. काेराेनाचा सर्वाधिक फटका बसलेला ब्रिटन हा चाैथ्या क्रमांकाचा देश आहे.


येथील सरकार बरे हाेणाऱ्या रुग्णांचे आकडे जाहीर करत नाही, परंतु वल्डाेमीटरच्या आकडेवारीच्या विश्लेषणानुसार ब्रिटनमध्ये आतापर्यंत केवळ ३४४ जण बरे झाले आहेत. खरे तर ब्रिटनमध्ये १ लाख ७७ हजार ४५४ रुग्ण आढळून आले आहेत, तर २७ हजार ५१० जणांचा मृत्यू झाला आहे. येथे १ लाख ४९ हजार ६०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राजधानी लंडनमधील चांगल्या रुग्णालयांची स्थितीदेखील दयनीय बनली आहे. येथे रुग्णांना जमिनीवर उपचार करावे लागत आहेत. दरराेज एक लाख नमुन्यांची तपासणी करण्याचे उद्दिष्टही पूर्ण हाेणे शक्य नसल्याचे सरकारने मान्य केले आहे. खरे तर एप्रिलच्या सुरुवातीला सरकारने हे लक्ष्य ठेवले हाेते. न्यायमंत्री राॅबर्ट बकलँड म्हणाले, आम्ही तपासणी वाढवत आहाेत. भलेही त्याची उद्दिष्टपूर्ती आज झाली नाही तरी चालेल. एक लाख नमुन्यांची तपासणी महत्त्वाची आहे. परंतु तूर्त आम्ही तपासणी करणे गरजेचे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button