breaking-newsआंतरराष्टीय

#CoronoVirus:चीनमध्ये संशयाने पाहिले जाते, उतरूही दिले जात नाही : भारतीय पायलट

जगभरातील अनेक देशांत सध्या लॉकडाऊन आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासालाही बंदी आहे. अशा स्थितीत काही पायलट मदतकार्यासाठी, आैषधी तसेच जीवनावश्यक वस्तू इतर देशांपर्यंत पोहोचवण्याच्या कामात सक्रिय आहेत. कॅप्टन अमरिंदरसिंह धारीवाल हेदेखील त्यापैकी होत. त्यांनी आतापर्यंत २० हून जास्त देशांत मदतकार्यात हातभार लावला आहे. धारीवाल यांनी २९ मार्च रोजी इराणहून १३६ लोकांना मायदेशी आणले. धारीवाल चीन, खाडीतील देश त्याशिवाय ढाका, यांगून, मालदीवपर्यंत मदतकार्यात सक्रिय राहिले आहेत. परंतु शांघायच्या उड्डाणांत सर्वाधिक वेळ लागतो, असे धारीवाल यांनी सांगितले. असे असूनही चीनमध्ये पोहोचल्यावर तेथील लोकांचे वर्तन अतिशय कोरडेपणाचे असते. त्यांचा देश महामारीपासून मुक्त झाला. त्यामुळे परदेशातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे चिनी लोक संशयाने पाहतात.

परदेशातून आलेला व्यक्ती विषाणू संसर्ग घेऊन तर आली नसेल ना? अशी भीती त्यांच्या मनात दिसते. आमचे विमान शांघायच्या विमानतळावर उतरते तेव्हा केवळ एक कमर्शियल स्टाफच दस्तऐवजांची देवाण-घेवाण करतो. विमानातून बाहेर येण्याची परवानगी दिलेली नसते. महामारीचे केंद्र राहिलेल्या वुहानबद्दल धारीवाल म्हणाले, शांघायला जाताना वुहानच्या आकाशातून जावे लागते. चीनच्या इतर महानगरांच्या तुलनेत जास्त उंचीच्या इमारती दिसतात. परंतु सध्या तरी तेथे फारशी वर्दळ नाही. त्याशिवाय चिनी विमानतळावरील कर्मचारी त्यांच्याच भाषेत बोलतात. परदेशातून येणाऱ्या विमानांना मुख्य मार्गापासून दूर उभे करण्याची सूचना दिली जाते. स्पाइसजेटशी संबंधित कॅप्टन धारीवाल यांच्या म्हणण्यानुसार, संकटाच्या या काळात आपण चीनमधून पीपीई किट, मास्क व आैषधी आणल्या. हाँगकाँगने आपल्याला मोठ्या संख्येने डिजिटल थर्मामीटर दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button