breaking-news

#CoronoVirus:औरंगाबादमध्ये आणखी 17 जण पॉझिटिव्ह

औरंगाबाद : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे औरंगाबादमध्ये कोरोनाचा वाढता कहर पाहायला मिळत आहे. औरंगाबादमध्ये आज (3 मे) कोरोनाचे आणखी 17 रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 273 वर पोहोचला आहे.

औरंगाबादमध्ये आज आणखी 17 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर दुसरीकडे काल (2 मे) 40 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे औरंगाबादेतील कोरोनाबाधितांचा आकडा 273 वर पोहोचला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 25 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.

औरंगाबादेत काल (1 मे) 39 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर आज (2 मे) औरंगाबादेत आणखी 23 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे गेल्या 24 तासात 62 नवे रुग्ण औरंगाबादेत आढळले आहे.

दरम्यान औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्हा अलर्टवर आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button