breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

Coronavirus Effect : सोन्याच्या दरात ऐतिहासिक घसरण

कोरोना विषाणुमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतोय… भारतीय शेअर बाजारात याचे परिणाम दिसत असून आज (१३ मार्च) सलग तिसऱ्या दिवशी बाजाराची घसरगुंडी उडाली. शुक्रवारी शेअर बाजार उघडताच निर्देशांकात तब्बल ३ हजार ९०.६२ अंकांची घसरण झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकही ९६६.१ अंकांनी घसरला. सोन्याच्या दरावरही याचे परिणाम झाले असून, दरात ऐतिहासिक घट झाली आहे.

शेअर बाजार उघडताच शुक्रवारी सोन्याचे दरही पडले. सोन्याच्या भावात २६०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमला ४१,५५६ रुपयांवर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरावर करोना विषाणूचा प्रभाव दिसून येत आहे. गुरुवारी सोन्याच्या दरात १२८ रुपयांनी घट नोंदवण्यात आली होती. त्यामुळे भाव ४४ हजार ४९० रुपयांवर आला होता. तर चांदीचे दरही ३०२ रुपयांनी स्वस्त झाले होते. चांदीला प्रति ४६ हजार ८८६ रुपये भाव होता. त्याचबरोबर कमॉडिटी मार्केटमध्ये (वस्तू बाजार) सोन्याच्या दरात ५८ रुपयांची घट झाली होती. त्यामुळे सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४३हजार २९७ रुपये इतका झाला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button