breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: सौदीवरून परतलेल्या सुरेश प्रभूंनी स्वत:ला विलग ठेवण्याचा घेतला निर्णय

माजी केंद्रीय रेल्वेमंत्री आणि भाजप खासदार सुरेश प्रभू यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर स्वत:हून विलग राहण्याचा निर्णय घेतला आहे. ते पुढील चौदा दिवस  इतरांपासून विलग राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सुरेश प्रभू हे कामानिमित्त सौदी अरेबियाला गेले होते. तिथून ते नुकतेच परतले आहेत. त्यांची कोरोना विषाणूची चाचणी करण्यात आली त्यांचे सर्व रिपोर्ट हे निगेटीव्ह आहेत. तरीही खबरदारी म्हणून त्यांनी पुढील १४ दिवसांसाठी विलग राहण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात कोरोनानं पाय रोवला आहे. 

अफगाणिस्तान, फिलीपाइन्स, मलेशिया सारख्या देशांतून  येणाऱ्या  नागरिकांना भारतात येण्यापासून बंदी घातली आहे. तर परदेशी नागरिकांना १५ एप्रिलपर्यंत भारतात येण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत

एपी या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार जगभरात १ लाख ९७  हजार लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे.  तर यामुळे जगभरात ७ हजार ९०० लोक मृत्युमुखी पडले आहेत. चीन, इटली, इराण, स्पेन यासांरख्या देशांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे.  राज्यात या विषाणूचा संसर्ग झालेल्यांची संख्या आता ४२ वर पोहोचली आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button