breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

#CoronaVirus: सोनू सूदने दिलं रमजानचं गिफ्ट; भरणार २५ हजार गरजूंचं पोट

संपूर्ण देशभरात करोना विषाणूमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मे पर्यंत लॉकडाउन वाढवलेला आहे. या काळातच मुस्लीम बांधवांसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजानच्या महिन्याला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे काळात अभिनेता सोनू सूदने मुस्लीम बांधवांना खास गिफ्ट दिलं आहे. त्याने गरजूंना जेवण पुरविण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

‘फिल्मफेअर.कॉम’नुसार, सोनू सूदने रमजान महिन्याच्या काळात जवळपास २५ हजार गरजूंना जेवण पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये बंगाल, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहारमधून आलेले बरेच कामगार सध्या मुंबईतील विविध भागांमध्ये अडकले आहेत. सध्या लॉकडाउन असल्यामुळे या कामगारांना अनेक समस्यांना सामोरं जाव लागत आहे. त्यामुळे त्यांना जेवण पुरविण्याचा निर्णय सोनूने घेतला आहे.

https://www.instagram.com/p/B-8yMc_AOLV/?utm_source=ig_embed&ig_mid=40166074-DC49-4339-BCD0-075B9AB58087

“सध्या देशात निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी एकत्र राहण्याची फार गरज आहे. त्यामुळे प्रत्येकाने एकमेकांना शक्य होईल त्याप्रमाणेच मदतीचा हात पुढे केला पाहिजे. रमजानच्या महिन्यात कोणी उपाशी राहू नये यासाठी मी हा लहानसा प्रयत्न करत आहे. दिवसभर उपवास केल्यानंतर या नागरिकांना रात्रीचं जेवण व्यवस्थित मिळावं म्हणून आम्ही जेवण पुरविण्याचा निर्णय घेतला आहे”, असं सोनू सूदने सांगितलं.

दरम्यान, सोनूने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत मदतीसाठी सगळ्यांनी एकत्र या असं आवाहन केलं आहे. विशेष म्हणजे लॉकडाउनच्या काळात संकटात सापडलेल्या नागरिकांसाठी सोनू विविध स्तरांमधून मदत करत आहे. यापूर्वी त्याने गरजूंना आर्थिक मदत केली आहे. त्यासोबतच मुंबईमधील त्याचं एक हॉटेल डॉक्टर, परिचारिका यांना राहण्यासाठी दिलं आहे. इतकंच नाही तर जवळपास ४५ हजार गरजूंसाठी त्याने जेवणाची, धान्याची सोय केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button