breaking-newsआंतरराष्टीयआरोग्यताज्या घडामोडी

#CoronaVirus: संकटातही भारताची भरारी! सर्वाधिक पीपीई कीट बनवणाऱ्या देशांच्या यादीत दुसऱ्या स्थानी

एक मार्च, करोनाचा देशात उद्रेक होण्यापूर्वी भारतात पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई) किट बनवणारी एकही फॅक्टरी नव्हती. पण, १८ मे पर्यंत तब्बल ४.५ लाख पीपीई किट्स प्रतिदिन तयार केले जाऊ लागले. गुंतवणूक सुविधांसाठी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या इन्व्हेस्ट इंडिया या कंपनीने प्रसिद्ध केलेल्या एका माहितीपुस्तिकेत ही माहिती दिली आहे.

संदर्भासाठी ३० मार्च ही तारीख घेतल्यास या दिवशी भारतात प्रतिदिन ८,००० पीपीई किट तयार केले जात होते. त्यानंतर हा अकडा वाढतच गेला. त्यामुळे पीपीई किट बनवणाऱं हे क्षेत्रचं आता ७,००० कोटी रुपयांची उलाढाल असलेली बाजारपेठ बनली आहे. भारतात या क्षेत्रानं केवळ ६० दिवसातचं ५६ पटींनी वाढ नोंदवली आहे. इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं आहे.

पीपीई किटमध्ये मास्क (एन ९५), ग्लोव्ह्ज (सर्जिकल आणि तपासणी), कोव्हराल्स (चेन असलेला पूर्ण लांबीचा बाहेरील कोट) आणि गाऊन, हेड कव्हर, गॉगल, फेस शिल्ड आणि शू कव्हर या गोष्टींचा समावेश असतो. आजच्या घडीला भारतात ६०० पेक्षा अधिक कंपन्यांना पीपीई किट तयार करण्यासाठी प्रमाणित करण्यात आलं आहे. या क्षेत्राची जागतिक बाजारपेठ सन २०२५ पर्यंत सुमारे ९२.५ बिलियन डॉलरपेक्षा जास्त झालेली असेल. जी सन २०१९ मध्ये ५२.७ बिलियन डॉलर इतकी होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button