breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus | ‘लॉकडाऊन’चा फज्जा, गर्दीत १३ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली | करोना व्हायरस फैलावण्यापासून रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभर लॉकडाऊन घोषित केला. परंतु, या ‘लॉकडाऊन’चा फज्जा उडताना दिसतोय. ‘लॉकडाऊन’नंतर घाबरून हातावर पोट असलेले अनेक गरिब मजूर मोठ्या शहरांतून आपल्या घराकडे निघालेले दिसत आहेत.
परंतु, करोना नाही तर रस्त्यांवरची ही गर्दीच त्यांच्यासाठी मृत्यूचं कारण ठरलीय. आत्तापर्यंत वेगवेगळ्या अपघातांत १३ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. यातील एका व्यक्तीचा मृत्यू जवळपास २०० किलोमीटर पायी चालल्यानंतर अचानक झाला तर १२ जणांचा मृत्यू अपघातात झाल्याचं समोर येतं आहे.