breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: राज्यात गेल्या २४ तासात ५ हजार २४ कोरोना रुग्णांची भर, १७५ मृत्यू
महाराष्ट्रात गेल्या २४ तासांमध्ये ५ हजार २४ नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे असं आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे. तसंच जे १७५ मृत्यू गेल्या चोवीस तासांमध्ये नोंदवले गेले आहेत त्यातले ९१ मृत्यू गेल्या ४८ तासांमधले देखील आहेत. तर ८४ मृत्यू मागचे आहेत. सध्याच्या घडीला ६५ हजार ८२९ केसेस कोरोना पॉझिटिव्ह आहेत असंही आरोग्य विभागाने म्हटलेलं आहे.