breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ७४८
राज्यात करोना व्हायरसचा प्रदुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला असून करोनाग्रस्तांच्या संखेत वेगानं वाढ होत आहे. राज्यात आज दिवसभरात नवीन ११३ रूग्णांची भर पडली आहे. राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ७४८ झाली आहे. आतापर्यंत ५६ जण करोनाच्या कचाट्यातून वाचले असून त्यांना डिसचार्ज देण्यात आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागनं दिली आहे.