breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

#CoronaVirus: राज्यसभा खासदार अमर सिंह यांची झुंज अपयशी, सिंगापूरमधील रुग्णालयात निधन

नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार अमर सिंह यांचे आज निधन झाले आहे. ते 64 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून किडनीच्या दीर्घ आजाराने ते त्रस्त होते. त्यांच्यावर सिंगापूरमधील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्तक्रिया करण्यात आलेली होती. मात्र आज त्यांचे निधन झाले आहे. अमर सिंह यांच्या निधनानंतर अनेक दिग्गज नेत्यांनी श्रद्धांजली वाहत हळहळ व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमर सिंह यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करत एक ट्विट केले. “अमर सिंह  हे एक ऊर्जावान नेते होते. गेल्या कित्येक वर्षांपासून देशातील राजकारणातील अनेक चढ-उतार त्यांनी फार जवळून पाहिले होते. ते त्यांच्या जीवनात मैत्रीसाठी ओळखले जातं. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून मी फार दु:खी झालो आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button