breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Lockdown: किराणा सामान आणायला गेला अन् सून घेऊन आला; आईनं घेतली पोलिसांत धाव

उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये लॉकडाउनच्या काळात एक अगदी विचित्र प्रकरण पोलिसांपर्यंत आलं आहे. झालं असं की येथील तरुण भाज्या आणि किराणा माल खरेदी करण्यासाठी गेला आणि चक्क लग्नच करुन घरी आला. हे पाहून त्याची आई बेशुद्ध पडली. आईने दोघांनाही घरात प्रवेश नाकारला. त्यानंतर झालेला वाद थेट पोलिसांपर्यंत पोहचला. बराच वेळ पोलीस स्थानकामध्ये हा गोंधळ सुरु राहिला आणि अखेर या सर्व प्रकरणावर संमतीने तोडगा काढण्यात पोलिसांना यश आले.

भाजी आणि किराणा माल आणायला जात असल्याचे सांगून हा तरुण आपल्या प्रेयसीशी लग्न करुन थेट तिला घरी घेऊन आला. मात्र त्याच्या आईने दोघांनाही घरात घेण्यास नकार दिला. त्यानंतर हे प्रकरण साहिबाबाद पोलीस स्थानकामध्ये गेलं. मुलगा, त्याची पत्नी आणि आई असे तिघेही पोलीस स्थानकामध्ये उपस्थित होते. “किराणा माल आणायला जातो सांगून निघाला आणि सूनच घेऊन आला. लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मुलाला घरामध्ये शिरु देणार नाही,” अशा शब्दामध्ये या महिलेने आपली भूमिका पोलिसांना सांगितली. “मी याला किराणा माल आणण्यासाठी पाठवलं होतं हा सून घेऊन आला. मला हे लग्न अजिबात मान्य नाही,” असंही या माहिलेने पोलिसांना स्पष्टपणे सांगितलं.

२६ वर्षीय गुड्डू आणि त्याची प्रेयसी सविता या दोघांचे खरचं लग्न झाले आहे की नाही याबद्दल पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली. गुड्डूची चौकशी करण्यात आली असता त्याने आम्ही मंदिरामध्ये लग्न केल्याचे पोलिसांना सांगितलं. मात्र या लग्नाचा कोणताही पुरावा मुलाला सादर करता आला नाही. दोन महिन्यापूर्वी हरिद्वारमधील आर्य समाज मंदिरात आम्ही लग्न केल्याचा दावा या मुलाने केला आहे. मात्र साक्षीदार नसल्याने त्यावेळी आम्हाला लग्नाचे प्रमाणपत्र (मॅरेज सर्टिफिकेट) बनवता आलं नाही. मी हरिद्वारला हे सर्टिफिकेट घेण्यासाठी जाणार होतो मात्र लॉकडाउनमुळे मला जात आला नाही, असं या मुलाने पोलिसांना सांगितलं. या तिघांच्या वादामुळे पोलीस स्थानकामध्ये एकच गोंधळ उडाला आणि पोलिसही सगळा प्रकार ऐकून चक्रावले. बराचवेळ हा वादविवाद सुरु राहिला. अखेर पोलिसांनी या मुलाला आणि मुलीला समज देत घरी जाण्याचा सल्ला दिला.

गुड्डू आणि त्याच्या पत्नी सविता हिने भाड्याच्या घरात राहण्याचा निर्णय घेतला आहे. सविता ही दिल्लीमध्ये भाडेतत्वावर राहत होती. मात्र लॉकडाउनच्या कालावधीमध्येच तिच्या घरमालकाने तिला घर खाली करण्यास सांगितलं. त्यामुळेच गुड्डूने तिला घरी घेऊन येण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी या घरमालकाला लॉकडाउनसंपेपर्यंत या दोघांना या घरात राहू देण्यास सांगितलं असल्याचे वृत्त, एएनआयने दिलं आहे. दुसरीकडे आईने लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला घरात घेणार नाही असं सांगत लॉकडाउन संपेपर्यंत घरी येण्याचा विचारही या दोघांनी करुन नये असं म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button