breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

Coronavirus : महाराष्ट्रात 17 जणांना बाधा, आयपीएल लांबणीवर, शाळांना सुट्ट्या, तर खासगी आयुष्य विस्कळीत

पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्याने आयपीएल सामना पुढे ढकलण्यात आला आहे. तीन राज्यांमध्ये शाळेला सुट्टी देण्यात आली आहे. तर, अनेक शहरांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 10 झाली आहे. नागपुरातही 3 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. मुंबई आणि ठाणे मिळून एकूण राज्यातली कोरोना बाधितांची संख्या 17 झाली आहे.

कर्नाटक सरकारने एका आठवड्यासाठी सर्व मॉल्स, चित्रपटगृहं आणि पब्ज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात कुठल्याही प्रकारे लोकांना एकत्र येऊन कार्यक्रम करण्यास मनाई करण्यात आली आहे. कॉन्फरन्स, कार्यक्रम लग्नसोहळेसुद्धा पुढे ढकलावेत असं सांगण्यात आलं आहे.

कर्नाटकशिवाय दिल्ली आणि बिहारमध्येही सर्व शाळा, महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूरमध्ये दोन दिवसांपूर्वी कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेला एक रुग्ण सापडला होता. त्याला शासकीय रुग्णालयात विलग ठेवून उपचार सुरू आहेत. आता त्याच्या बायकोचा आणि भावाचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे.

बिहार सरकारने राज्यातल्या सगळ्या शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस येत्या 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शासनातर्फे मिळणारा पोषण आहार बंद होऊ नये म्हणून प्रत्येक शासकीय शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये शाळा बंद असेपर्यंत तेवढे पैसे जमा करण्यात येणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button