breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: महाराष्ट्रात ३९४ नवे कोरोना रुग्ण, १८ मृत्यू, संख्या ६ हजार ८०० च्याही पुढे

महाराष्ट्रात करोनाचे ३९४ नवे रुग्ण आढळले आहेत. तर मागील २४ तासात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राची रुग्णसंख्या ६ हजार ८१७ इतकी झाली आहे. तर आत्तापर्यंत महाराष्ट्रात करोनाची लागण होऊन ३१० जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत ९५७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आज झालेल्या १८ मृत्यूंपैकी ११ मृ्त्यू मुंबईत, पाच पुण्यात तर दोन मालेगावमध्ये झाले आहेत. आज झालेल्या १८ मृत्यूंमध्ये १२ पुरुष रुग्ण तर सहा महिला रुग्णांचा समावेश आहे. आज झालेल्या १८ मृत्यूंमध्ये १२ पुरुष रुग्ण आणि सहा महिला रुग्णांचा समावेश आहे. मृत्यू झालेल्या १८ रुग्णांपैकी नऊ रुग्ण हे ६० वर्षे वयाच्या वरचे होते. तर ६ रुग्ण हे ४० ते ५९ वर्षे या वयाचे होते. तर तीन रुग्ण हे ४० वर्षे वयाखालील होते. १८ पैकी १२ रुग्णांना हायपर टेन्शन, अस्थमा, हृदय रोग या आजारांची हिस्ट्री होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button