breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

# CORONAVIRUS: भाजी विक्रीला होणारी गर्दी रोखण्यासाठी ‘सोशल डिस्टंसिंग; आमदार सुनील शेळके यांच्या ‘तळेगाव पॅटर्न’ची राज्यभर चर्चा!

– राज्यातील विविध शहरातील प्रशासनांकडून अनुकरण

– सामाजिक संस्था, संघटनांनीही घेतली उपक्रमाची दखल

तळेगाव । महाईन्यूज ।प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात ‘लॉकडाउन’ची घोषणा केली. तसे शहरांतील विविध भाजी विक्रेते, किरणा मालाच्या दुकानांसमोर नागरिकांनी गर्दी केली. त्यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावाची शक्यता निर्माण झाल्यामुळे तळेगाव परिसरात मावळचे आमदार सुनील शेळके यांनी ‘सोशल डिस्टंसिंग’ची शक्कल लढवली आहे.

तळेगाव पोलिसांच्या मदतीने भाजी खरेदीसाठी सुरक्षित अंतरावर मोठे रखाने आखून लोकांना उभे राहण्याची सोय केली होती. त्याच धर्तीवर आता पोलिस ही सुरक्षित अंतरावर उभे राहून सोशल डिस्टंसिंगचे महत्त्व पटवून देत आहेत. लोकांनी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी अनावश्यक गर्दी करू नये असे वारंवार आवाहन करून देखील लोक भाजी व किराणा खरेदी साठी गर्दी करताना दिसत आहेत. सोशल डिस्टंसिंग चे भान नागरिकांना व्हावे म्हणून तळेगाव पोलिसांनी आता सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलिस कर्मचारी ही सुरक्षित अंतरावर उभे राहून सोशल डिस्टंसिंग पालन करत आहेत.

भाजी खरेदीसाठी होणार्या गर्दीवर उपाय म्हणून सुरुवात करण्यात आलेला तळेगाव पॅटर्न आता औरंगाबाद, नांदेड शहरात देखील अवलंबला जातो आहे. एवढेच नव्हे तर खूप लोकांनी या पॅटर्नचे कौतुक करत शेअर केला जात आहे.

काय आहे आदर्शवत ‘तळेगाव  पॅटर्न’…?

तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्या नियोजनाखाली शहरात १६ ठिकाणी भाजीविक्री व फळविक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी चार भाजी विक्रेते व एक फळविक्रेता यांना परवानगी देण्यात आली आहे. त्यांना मास्क व सॅनिटायझरचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. भाजी व फळांबरोबर या ठिकाणी सॅनिटायझरही विक्रीसाठी उपलब्ध आहेत.एका स्टॉलसमोर एकाच वेळी पाचपेक्षा अधिक ग्राहक थांबणार नाहीत, याची काळजी घेण्यात येत आहे. ग्राहकांना भाज्या व फळे निवडून घेण्याची मुभा नाही. विक्रेत्यांना चढ्या भावाने भाजी व फळे विकण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच, ग्राहकांना ठराविक अंतरावर उभे राहण्यासाठी रस्त्यावर पट्टे (पेंटिंग) आखण्यात आले असून, त्याचे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ठराविक अंतरावर भाजी खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांनी उभे राहावे यासाठी चौकोन आखण्यात आले आहेत, अशी माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button