breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: फ्रान्समध्ये कोरोनाच्या फैलावामागे एका चर्चमधील प्रार्थना कारणीभूत

फ्रान्समध्ये कोरोना विषाणुची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या ४० हजारांहून अधिक झाली आहे. कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी फ्रान्स सरकारने कठोर उपाययोजना आखल्या होत्या. युरोपीयन देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावत आहे. या फैलावामागे फ्रान्समधील एका चर्चमधील प्रार्थना कारणीभूत असल्याची चर्चा सुरू आहे . फ्रान्स सरकारला हे कारण समजेपर्यंत या चर्चमध्ये आलेले अनेक भाविक युरोप, आफ्रिका, लॅटिन अमेरिकेतील देशांमध्ये परतले होते.

या चर्चच्यावतीने होणारा धार्मिक महोत्सव आठवडाभर सुरू असतो. फ्रान्समधील म्यूलहाऊसमध्ये हजारोजण या महोत्सवात सहभागी झाले होते. सुपरचर्च ख्रिश्चन ओपन डोर मासचे आयोजन १८ फेब्रुवारी पार पडले होते. म्यूलहाऊसची सीमा जर्मनी आणि स्वित्झर्लंड या देशांशी जोडली गेली आहे. या महोत्सवात सहभागी झालेल्या एकाला करोनाची बाधा झाली असणार. त्याच्या संसर्गातून फ्रान्स आणि युरोपीयन देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग फैलावला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे

स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, चर्चमधील ही सामुदायिक प्रार्थना फ्रान्समधील कोरोना संसर्गाच्या फैलावाचे केंद्र ठरले. जवळपास २५०० कोरोनाबाधितांचा संबंध या चर्चसोबत आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या प्रार्थना सभेत उपस्थित असणाऱ्या १७ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button