breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: धक्कादायक! महाराष्ट्रात २२५९ नवे कोरोना रुग्ण, १२० मृत्यू, संख्येने ओलांडला ९० हजारांचा टप्पा

महाराष्ट्रात २२५९ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या ९० हजार ७८७ झाली आहे. आत्तापर्यंत ४२ हजार ६३८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ४४ हजार८४९ रुग्ण सध्याच्या घडीला अॅक्टिव्ह आहेत. मागील २४ तासांमध्ये १२० मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आत्तापर्यंत करोनाची बाधा होऊन मृत्यू झालेल्यांची संख्या ३ हजार २८९ झाली आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आज राज्यात १६६३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत डिस्चार्ज मिळणाऱ्या रुग्णांची संख्या ४२ हजार ६३८ इतकी झाली आहे. राज्यात सध्याच्या घडीला ४४ हजार ८४९ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे आता ४६.९६ टक्के इतके झाले आहे. राज्यातील मृत्यू दर हा ३.६ टक्के इतका आहे. सध्या राज्यात ५ लाख ६८ हजार ७३ रुग्ण होम क्वारंटाइन आहेत तर २६ हजार ४७० रुग्ण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

मागील २४ तासांमध्ये १२० मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये ८० पुरुष तर ४० महिला आहे. यामध्ये ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या रुग्णांची संख्या ६२ होती. तर ४७ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातले होते. ११ जणांचे वय हे ४० वर्षांखालील होते. गेल्या २४ तासांमध्ये मृत्यूंपैकी ४९ मृत्यू हे मागील दोन दिवसांमधले आहेत. आजवर पाठवण्यात आलेल्या ५ लाख ७७ हजार ८१९ नमुन्यांपैकी ९० हजार ७८७ पॉझिटिव्ह आले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button