breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: देशभरात कोरोना रुग्णांची संख्या ३७ हजार ७०० च्या वर
देशभरात करोना रुग्णांची संख्या ३७ हजार ७७६ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत १० हजार १८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर देशभरात आत्तापर्यंत १२२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. देशभरात करोनाचं संकट संपलेलं नाही. रुग्णसंख्या रोज वाढते आहे. तसंच लॉकडाउनचा कालावधीही १७ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे.