breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: जळगावात कोरोनाग्रस्तांसाठी दोन रुग्णालये अधिग्रहीत

जिल्ह्यातील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि गोल्ड सिटी रूग्णालय करोनाग्रस्त रुग्णांसाठी अधिग्रहीत करण्यात आले आहे. तसेच करोनाव्यतिरिक्त असणाऱ्या रुग्णांसाठी शाहू महाराज रुग्णालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात नेहमीप्रमाणे सुविधा राहतील, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा रुग्णालयात मुंबईच्या जे.जे.रुग्णालयातील डॉक्टर मधुकर गायकवाड हे सेवा देण्यासाठी उपलब्ध झाले आहेत. शहरात मेट्रोपोलिटीन आणि कृष्णा लॅब या खासगी प्रयोगशाळा नमुना तपासणी करीत आहेत. पावसाळा सुरू झाल्यावर इतर आजारांचे रुग्णदेखील वाढतात. त्यांना वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून जिल्हा रुग्णालयाचा भार हलका केला जात आहे. डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७५० खाटा आणि अतीदक्षता विभागात उपचाराची व्यवस्था आहे. तसेच गोल्ड सिटी रूग्णालयात ५० खाटा आणि गणपती रुग्णालयात उपचार होणार आहेत. महात्मा फुले जन आरोग्य योजनेनुसार जिल्ह्यातील ३३ रुग्णालयात मोफत उपचार होणार आहेत. याबाबत कोणाची काही तक्रार असेल तर वॉर रूममध्ये १०७७ या क्रमांकावर तक्रार केल्यास निरसन होईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

नमुने तपासणी अहवाल ४८ तासाच्या आत मिळतील अशी सुविधा करण्यात आली आहे. भुसावळला ट्रॉमा सेंटरमध्ये नियमित १०० रुग्ण उपचार घेऊ शकणार आहेत. धरणगाव आणि चोपडा येथील ग्रामीण रुग्णालयात निधी देऊन तेथे सुविधा पुरविल्या जातील, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button