breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘मी पुन्हा येईन’ म्हणत उपमहापाैर निवडीतून राष्ट्रवादी नगरसेवकाची माघार, तुषार हिंगे यांची बिनविरोध निवड

उपमहापाैर पदी कला, क्रीडा, साहित्य व सांस्कृतिक समितीचे सभापती तुषार हिंगे बिनविरोध

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवड महानगरपालिका उपमहापाैर पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार नगरसेवक राजू बनसोडे यांनी सभागृहात ‘मी पुन्हा येईन’ म्हणत अर्ज काढून घेत माघार घेतली. त्यामुळे कला, क्रीडा, साहित्य व सांस्कृतिक समितीचे सभापती तुषार हिंगे यांची उपमहापाैर पदी बिनविरोध निवड झाली.

पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज (शुक्रवारी दि.22) महापाैर – उपमहापाैर पदाची निवडणुक पार पडली. या निवडणुक प्रक्रियेत पीठासिन अधिकारी म्हणून पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शान्तनु गोयल यांनी कामकाज पाहिले.

महापालिका उपमहापाैर पदाच्या निवडणुकीत भाजपकडून कला, क्रीडा, साहित्य व सांस्कृतिक समितीचे सभापती तुषार हिंगे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नगरसेवक राजू बनसोडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. निवडणुक कामकाजात दोन्ही उमेदवाराचे अर्ज छाननीत वैद्य ठरले. त्यानंतर दोन्ही उमेदवाराना अर्ज माघारी घेण्यास पंधरा मिनिटे वेळ देण्यात आला. या कालावधीत शेवटच्या पाच मिनिटात राष्ट्रवादीचे नगरसेवक बनसोडे यांनी उमेदवारी अर्ज काढून घेत निवडणुकीत माघार घेतली. त्यामुळे उपमहापाैर पदी तुषार हिंगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button