breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: घरगुती गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तेल कंपन्यांचा ग्राहकांना दिलासा

देशभरात लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असताना एक दिलासादायक बातमी आहे. एलपीजी गॅस सिलेंडर सुमारे ६० रुपयांनी स्वस्त झाला आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने बुधवारी याची घोषणा केली.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या घोषणेनुसार, दिल्लीत एलपीजी सिलेंडर ६१.५० रुपयांनी स्वस्त झाला आहे, त्यामुळे याची किंमत ७४४ रुपये असेल. तर मुंबईत गॅस सिलेंडर ६२ रुपयांनी स्वस्त झाला असून त्याची किंमत ७१४.५० रुपये असेल.

या नव्या दरांनुसार देशातील चार महानगरांमधील दर असे असतील-

  1. दिल्ली – ७४४.०० (नवा दर), ८०५.५० (जुना दर)
  2. कोलकाता – ७७४.५० (नवा दर), ८३९.५० (जुना दर)
  3. मुंबई – ७१४.५० (नवा दर), ७७६.५० (जुना दर)
  4. चेन्नई – ७६१.५० (नवा दर), ८२६.०० (जुना दर)

दरम्यान, देशातील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (एचपीसीएल) या सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी ३० मार्च रोजी करोनाच्या पार्श्वभूमीवर एक महत्वाची घोषणा केली होती. यामध्ये जर करोनामुळे सिलेंडर घरोघरी पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉय आणि इतर कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास ५ लाख रुपयांचे मदत देण्याची घोषणा केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button